Ad will apear here
Next
कलावंतांनी कलावंतांसाठी केलेलं ‘कलापूर’
पुण्याहून पौड गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर उजव्या दिशेला एक बाण आपल्याला ‘मिस्टिक व्हिलेज’ नावाची पाटी दाखवतो. त्या रस्त्याने गेल्यावर तिथेच ‘सुंबरान’ नावाचं एक अद्भुत ठिकाण आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार आणि अभिनव कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य रावसाहेब गुरव यांच्या कलासक्त मनाने आणि नजरेने त्या उजाड माळरानावर एका विलक्षण वास्तूचं स्वप्न पाहिलं आणि प्रत्यक्षात आणलं. ‘बाइट्स ऑफ इंडिया’चे प्रसन्न पेठे यांनी ‘सुंबरान’ला भेट देऊन रावसाहेब गुरव यांच्याशी मारलेल्या या गप्पा...
........
- सर, या अद्भुत दुनियेची कल्पना कशी सुचली?
- माऊली स्वामींच्या मदतीने ही जागा घेतली होती, तेव्हा इथे अक्षरशः माळरान होतं. ओसाड जमीन. इथे जेव्हा आम्ही घर बांधायचं ठरवलं, तेव्हाच ते इकोफ्रेंडली असावं हे डोक्यात पक्कं होतं. प्रख्यात आर्किटेक्ट लॉरी बेकर यांच्या विचारांनुसार काही असावं, म्हणून दीड वर्ष डिझाइनवर घालवली आणि ५५ डिझाइन्स पाहून शेवटी हे पक्कं केलं, तेही लॉरी बेकर यांच्या शिष्यांपैकी श्री. माळी हे आर्किटेक्ट मिळाले तेव्हा. त्यांनी ३२ फुटी आर्चचं डिझाइन केलं. हे सगळं पाच कमानींवर उभारलंय. त्यांना या डिझाइनबद्दल राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. घराचं ‘इंटिरिअर’ मात्र कोणाला कॉन्ट्रॅक्ट न देता मी स्वतः आणि चित्राने मिळून केलं. या घराचं डिझाइन ९९ टक्के लोकांना आवडत नाही.....(थांबून...) तर १०० टक्के लोकांना आवडतं! भरपूर हवा आणि भरपूर उजेड कायम मिळत राहील, असं हे डिझाइन आहे. 

- ‘सुंबरान’ हे नाव कसं सुचलं? 
- गेली २५-३० वर्षं मी ‘धनगर’ या विषयावर पेंटिंग्ज करतोय. जगभर माझी पेंटिंग्ज जातात. कारण धनगर म्हणजे शेफर्ड सर्वच संस्कृतींत असतो. आणि मी कोल्हापूरचा. तिथल्या धनगरांचं आयुष्य जवळून न्याहाळलं. त्यांच्याबरोबर राहिलो. त्यांचं वागणं जवळून पाहिलं. त्यांचं विशिष्ट प्रकारे फेटा बांधणं, कपाळावर भंडारा लावणं हे मला भावलं होतं. त्यांची काही गाणी माहिती झाली. ती लिखित स्वरूपात नाहीत, तर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गाऊन, ऐकूनच पुढे जात राहिली आहेत. ‘सुंबरान मांडलं गा, सुंबरान मांडलं’ ही देवाची आळवणी आणि देवाची आठवण करणं हे मला भावलं. सुंबरान म्हणजे आठवण किंवा स्मरण हाच धागा आम्ही पकडला. आमच्याकडे येणाऱ्यांना आमची आठवण असावी आणि आम्हाला त्यांची ओळख राहावी म्हणून हे नाव दिलं.

- हे सगळे मोठाले दगड, शिळा, चिरे कुठून आणले?
- जांभा दगड म्हणजेच चिरे कोकणातून मागवून जागेवरच हव्या त्या आकारामध्ये कापून घेतले. या सगळ्या बांधकामाला जवळपास २० हजार दगड लागले आहेत. बाकी गार्डनमधले काही मोठे दगड इथल्याच प्लॉटमधले आहे, तर काही कारागिरांनी जागेवर बनवलेले आहेत. जवळजवळ पाच-सहा वर्षं काम चाललं होतं. इथे रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प केला आहे. जांभ्या दगडामुळे एक प्रकारचा गारवा कायम मिळत राहतो. या परिसरात पाचेक हजार झाडं लावली आहेत. 

- घराच्या रचनेविषयी काय सांगाल?
- त्या ३२ फुटी आर्चमुळे आणि मधल्या ७० फूट लांब भिंतीमुळे घराचे दोन भाग झालेत. तरीही आत शिरल्यावर आतल्या गोलाकार रचनेमुळे कुठली खोली कुठे हे पटकन कळत नाही, अशी रचना केली आहे. आमच्या राहण्याच्या खोल्या आणि स्वयंपाकघराव्यतिरिक्त माझा आर्ट स्टुडिओ आणि मेडिटेशन रूम वर आहे. ओपन कन्स्ट्रक्शन आणि गवाक्षांमुळे भरपूर नैसर्गिक उजेड सगळीकडे मिळतो. प्रत्येक खोलीतून बाहेरचं गार्डन दिसू शकतं. स्टेनग्लासमुळेही एक वेगळाच लाइट इफेक्ट आलाय. सर्वत्र उजेड, नेत्रसुखद हिरवळीमुळे आणि पाण्याच्या वाहत्या प्रवाहामुळे खूप सुंदर पॉझिटिव्हिटी अनुभवायला मिळते आणि त्यामुळे मनाला शांती आणि समाधान मिळतं. 

- इथे तुम्ही कोणत्या प्रकारचे उपक्रम आयोजित करता?
- उत्स्फूर्तपणा आणि आनंद देणारी चित्रकला, शिल्प, नृत्य यासंबंधीची शिबिरं, अच्युत पालव यांची कॅलिग्राफी वर्कशॉप्स असे कार्यक्रम इथे होतात. काही योग-मेडिटेशनचीही शिबिरं होतात. त्यासाठी इथे जागा ठेवली आहे. एक अॅम्फी थिएटर बांधलं आहे. एक प्रोजेक्टर रूमसुद्धा आहे. आमच्या घराच्या बांधकामादरम्यानच्या निवडक क्षणांची आम्ही एक ‘मेकिंग ऑफ ...’ अशी फिल्मसुद्धा बनवली आहे.

- बांधकामादरम्यानच्या अनुभवाच्या या फिल्मचे काही अनुभव? 
- खूप वेगवेगळ्या प्रांतातले कारागीर, कामगार आले होते. राजस्थान, बंगाली, ओडिशा अशा राज्यांतून. राजस्थानी कारागीर शाकाहारी, तर बंगाली लोकांना नॉन-व्हेज लागायचं. मग त्यांच्यात थोडी धुसफूस व्हायची; मग त्यांची धुसफूस सोडवायला लागायची; पण सर्वांनी फारच मेहनतीनं घराचं बांधकाम केलंय.  त्या वेळच्या शूटिंगच्या मजेदार आठवणी आहेत. काम पूर्ण झाल्यावर सर्व जण जाण्याआधी आम्ही एक समारंभच केला होता. सर्वांना फेटे, खायला-प्यायला..आणि मग डीजे लावून धमाल... एरव्ही अवतारात असणारे सगळे अगदी गॉगल-बिगल लावून हिरो बनून धमाल नाचले. अजूनही काही जण भेटायला येतात.

- सुंबरान आर्ट फाउंडेशनचं काम कसं चालतं?
- देशातल्या माध्यमांचं जेवढं लक्ष इतर कलांकडे, साहित्याकडे असतं, तेवढं चित्रकला, शिल्पकला यांच्याकडे नसतं असं जाणवतं. त्यामुळे या कलांना उत्तेजन देण्यासाठी आणि चित्रकारांचा, शिल्पकारांचा उचित सन्मान करण्यासाठी आम्ही दोघांनी मिळून ‘सुंबरान आर्ट फाउंडेशन’ची स्थापना केली. मी संस्थेचा चेअरमन आहे, तर माझी कन्या चित्रा मेटे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहते. आर्ट कॅम्प्स, आर्ट वर्कशॉप्स, आर्ट एक्झिबिशन्स, आर्ट कॉम्पिटिशन्स आणि गुणवंत कलाकारांचा गौरव या संस्थेतर्फे आम्ही करत असतो. 

(रावसाहेब गुरव आणि त्यांची कन्या चित्रा मेटे यांचं मनोगत आणि ‘सुंबरान’ची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZSABK
Similar Posts
‘सकारात्मकतेकडे पाहायला हवे’ ‘माध्यमं आणि सोशल मीडियात नकारात्मकतेचं प्रमाण अधिक असलं, तरी आपल्याला भेटणारी बहुतांश माणसं आणि येणारे अनेक अनुभव सकारात्मकच असतात. नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करून आपण त्यावर लक्ष केंद्रित करायला हवं,’ असं सुप्रसिद्ध पत्रकार, लेखिका, प्रवासवर्णनकार आणि स्थापत्यशास्त्राच्या अभ्यासक शेफाली वैद्य यांना वाटतं
एमसीई सोसायटीतर्फे चार कला शिक्षकांचा गौरव पुणे : ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘पी. ए. इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स, डिझाइन अँड आर्टस’च्या वतीने ‘१७ व्या आंतरराष्ट्रीय अॅनिमेशन डे’ निमित्त ‘अखिल भारतीय कला शिक्षक गौरव पुरस्कार २०१८-१९’चे आयोजन करण्यात आले होते.या वेळी भारतीय रुपयाच्या नव्या डिझाईनचे डिझायनर डॉ. उदय
सहासष्टाव्या कलेचे जादूगार पूर्वापार माहीत असलेल्या ६४ कलांव्यतिरिक्त जाहिरात/सिनेमा ही ६५वी कला आहे आणि ‘थीम पार्क’ या आधुनिक आविष्काराला ६६वी कला मानलं गेलंय! ‘थीम पार्क’मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावून इंग्लंड, डेन्मार्क, प्राग, जपानसारख्या देशांमध्ये काम करणारे, तसेच सिनेमा संकलन आणि माध्यम क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव
‘तीन दशकांचं, दृढ होत जाणारं नातं’ ‘गंधर्व’ला नाटक करणं हे जणू एक स्टेटस सिम्बॉल असल्यासारखं असायचं!....’ ही भावना आहे ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांची. ‘बालगंधर्व’च्या सुवर्णमहोत्सवाच्या औचित्यानं त्यांची भेट घेतली असता, त्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला, या नाट्यगृहाची वैशिष्ट्यंही सांगितली आणि तीन दशकांहून अधिक काळ या नाट्यगृहाशी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language